समृद्धी महामार्गावर मोटार अपघातात दोन ठार   

बुलडाणा : समृद्धी महामार्गावर रस्ता ओलांडताना दोन कामगारांचा मोटारीच्या धडकेत मृत्यू झाला. बुलडाण्यातल्या डोणगावमधील अग्रवाल पेट्रोल पंपासमोर गुरुवारी सकाळी हा अपघात झाला. 
 
आशिष आदिवासी (२१, रा. कुंमरी, जि. आमरोह, मध्य प्रदेश) आणि ज्ञानेश्वर बोरसे यांचा या अपघातात मृत्यू झाला. महामार्गावरील झाडांना पाणी देण्याचे काम ते करतात. ठिबक सिंचनसाठी पाण्याचे बॅरल भरून आणण्यासाठी  आशिष आणि ज्ञानेश्वर महामार्ग ओलांडत होते. मात्र, त्यांनी महामार्ग ओलांडताना  आजूबाजूला न पाहिल्याने मोटारीने त्यांना जोरदार धडक दिली. मोटार चालकाने त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, नियंत्रण सुटल्याने मोटारीने आशिषला जोरदार धडक दिली. यात आशिषचा जागीच मृत्यू झाला. ज्ञानेश्वर गंभीर जखमी झाला होता; उपचारादरम्यान त्यानेही प्राण सोडले. समृद्धी महामार्गावरील वाढत्या अपघातांमुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. 

Related Articles